
तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर काल सोमवारपासून लोकलची दारे कमी गर्दीच्या वेळांत सर्वसामान्यांना उघडी करण्यात आली आहेत. या लोकलच्या वेळा नोकरदारांना जुळणाऱया नसल्या तरी हळूहळू प्रवाशांची गर्दी वाढत आहे. लोकलच्या गर्दीला टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱया वातानुपूलित लोकलचे पास काढणाऱयांचीही संख्या आता वाढली आहे.
सोमवार, दि.1 फेब्रुवारीपासून लोकलची सेवा सर्वसामान्यांना खुली करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी गर्दी असल्याने आता वातानुपूलित लोकलला प्रवासी प्राधान्य देत आहेत. 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलला डिसेंबर महिन्यात 2,240 प्रवासी तिकीटे आणि 1,388 सिझन पासची विक्री होऊन एपूण 70,450 प्रवासी लाभल्याने एपूण 30 लाख 26 हजार 595 उत्पन्न मिळाले आहे. जानेवारी महिन्यात 1,618 प्रवासी तिकीटे आणि 1,011 सिझन पासची विक्री होऊन 52 हजार 64 प्रवाशांद्वारे 21 लाख 74 हजार 870 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर 1 फेब्रुवारी रोजी एका दिवसात 95 प्रवासी तिकीटे आणि 233 सिझन पासांची विक्री होऊन 6,927 प्रवाशांद्वारे 2 लाख 65 हजार 436 उत्पन्न मिळाले आहे. अशी आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलला 3,953 प्रवासी तिकीटे, 2,632 सिझन पास तसेच 1 लाख 29 हजार 441 प्रवाशांद्वारे एपूण 54 लाख 66 हजार 901 रुपयांची कमाई झाली आहे.
मध्य रेल्वेच्या एसी लोकलची 14 लाखांची कमाई
17 डिसेंबरपासून सुरू झालेल्या मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या कल्याण ते सीएसएमटी अशा दररोज दहा फेऱया होत असून आतापर्यंत या एसी लोकलद्वारे 912 तिकीटे, 406 सिझन पास तसेच 18,583 प्रवाशांद्वारे एपूण 14 लाख 47 हजार 676 रुपयांची कमाई झाली आहे. तर मंगळवारी सायंकाळी 5.20 पर्यंत मध्य रेल्वेच्या एसी लोकलला 16 प्रवासी तिकीटे, 10 सिझन पास विक्री आणि 516 प्रवाशांद्वारे 20,350 रुपयांची कमाई झाली आहे.
दुसऱया दिवशी 32 लाख प्रवासी
मध्य रेल्वेवर मंगळवारी विनातिकीट प्रवास करणाऱऱया 1700 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून साडे पाच लाख रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. एकटय़ा दादर स्थानकात 400 फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून 89 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. काल पहिल्या दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून 26 लाख प्रवाशांनी प्रवास केला तर मंगळवारी मध्य रेल्वेवर सायंकाळी सहापर्यंत 14 लाख प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वेवर रात्री उशीरापर्यंत अंदाजे 20 लाख तर पश्चिम रेल्वेवर 12 लाख असे एपूण 32 लाख प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वेवर विनामास्क प्रकरणात 282 केसेस दाखल करण्यात येऊन 47,900 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. सायं.6 पर्यंत विनातिकीट प्रवासाच्या 404 केसेस दाखल होत 1 लाख 9 हजार 130 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
































































