दीडशे रुपयांची लाच घेताना मनपा कर्मचाऱ्याला अटक

26

सामना प्रतिनिधी । परभणी

कामगार प्रमाणपत्र देण्यासाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ लिपीकाला दिडशे रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवार, ६ रोजी सकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

येथील महानगरपालिका प्रभाग समिती ब मधील अनिल गुलाबराव देशमुख (४२) हे वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे शहरातील एका तक्रारदारांने त्यांच्या वडील व मित्रांच्या नावाचे कामगार प्रमाणपत्राची मागणी केली. यासाठी देशमुख यांनी दिडशे रुपयांची लाच तक्रारदाराला मागीतल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आज सकाळच्या सुमारास महानगरपालीकेच्या जुन्या इमारतीत सापळा रचून ही कारवाई केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर व पोलीस उपाधिक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली असून शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

आपली प्रतिक्रिया द्या