सांगोला-पंढरपूर रस्त्यावर अपघात, 5 वारकऱ्यांचा मृत्यू

1145

कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या 5 वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे वारकरी बेळगांव जिल्ह्यातील होते. या वारकऱ्यांच्या गाडीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा अपघात घडला. सांगोला-पंढरपूर रस्त्यावर मांजरी गावाजवळ हा अपघात झाला आहे.

शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या गाडी चालकाचाही समावेश आहे. या अपघातामध्ये सात जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे हलविण्यात आले आहे. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. यल्लप्पा देवाप्पा पाटील(३७), कृष्णा वामन कणबरकर (४२), महादेव मल्लप्पा कणबरकर (४५),लक्ष्मण परशुराम आंबेवाडीकर(४५)अरुण दत्तात्रय मुतकेकर (३७) अशी त्यांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या