परळी-बीड रस्त्यावर कारची दुचाकीला धडक ; एकाचा मृत्यू

1506

परळी बीड मार्गावर कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. कार दुचाकीला धडकून पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. गाढे पिंपळगाव फाट्याजवळील उतारावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सिरसाळ्याहून परळीकडे येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायलस्वार अनिकेत आव्हाड (वय 25,रा.कंडक्टर काँलनी, परळी) या  युवकाचा मृत्यू झाला आहे.

दुचाकीला धडकल्यावर कार नदीवरील पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली. अपघातात जखमी झालेल्या अनिकेतला उपचारासाठी आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला  मृत घोषित केले. पुलावरुन खाली कोसळलेली कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. सुदैवाने यातील प्रवासी सुखरुप आहेत. अनिकेत आव्हाड हा एकुलता एक मुलगा होता.त्याला चार बहिणी आहेत. घरातील कर्त्या युवकाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या