पायधुनीत भीषण अपघात; भरधाव कार हॉटेलात घुसली,  4 ठार, 4 जखमी

accident

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात आज रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. एक भरधाव कार हॉटेलवर जाऊन धडकली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाल्याचे समजते.

पायधुनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोकमान्य टिळक मार्गावरील मांडवी कोळीवाडा येथे कॅफे जनता नावाचे हॉटेल आहे. सोमवारी रात्रीच्या सुमाराम वेगात असलेल्या एस्टिम कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार कॅफे जनता हॉटेलवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा चक्काचूर तर झालाच, पण चौघांना जीव गमवावा लागला. शिवाय अन्य चौघे जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या