पेणजवळ अपघात; 9 वर्षांची चिमुरडी बचावली, मात्र आई दगावली

781

मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी सकाळी एक अपघात झाला. या अपघातात 9 वर्षांच्या चिमुरडीला साधे खरचटलेही नाही. मात्र तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. पेण तालुक्यातील हमरापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. निकीता ओंकार सोनवणे (28 वय) असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

गुरुवारी रात्री शिंदे कुटुंबीय सिंधुदुर्ग कुडाळ येथून मुंबईला निघाले होते. शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील हमरापूर फाटा येथे आले असता पुढे जात असलेल्या ट्रकला त्यांच्या गाडीने मागून ठोकले. या अपघातामध्ये राम शिंदे (वय59), सुनंदा शिंदे (वय55) आणि चालक प्रथमेश शिंदे हे जखमी झाले. अपघातामध्ये निकीता यांच्या 9 वर्षांच्या मुलीला साधे खरचटलेही नाही. यामुळे प्रत्यक्षदर्शींनी देवाचे आभार मानले. मात्र तिच्या आईचा मृत्यू झाल्याचे कळताच सगळ्यांना प्रचंड दु:ख झाले. जखमींना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या