
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार आणि टँकरची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. कारने टँकरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे कळते आहे. रसायनीजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सगळेजण साताऱ्याला लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून मुंबईला परत येत असताना हा अपघात झाला आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.




























































