घोडबंदर रोडवर टँकर-कंटेनरची धडक, एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident-ghodbandar-road

सामना प्रतिनिधी । ठाणे

घोडबंदर रोडवर गायमुख ऑक्ट्राय नाक्याजवळ दुधाचा टँकर आणि लोखंडी रोल वाहून नेणाऱ्या कंटेनरची धडक झाली. त्यात चालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर घोडबंदर रोड परिसरातील वाहतूक काही काळ मंदावली होती.