भाविकांच्या गाडीला पंढरपुरात अपघात; दोन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढीनिमित्त बेळगाव जिह्यातून पंढरपूरला येणाऱया भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव फाटा येथे घडली आहे. यात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

राजू संभाजी शिधोलकर, परशुराम संभाजी जवरूचे अशी मृतांची नावे असून चालक राजकवी कृष्णा मधुकर, गीतेश पोपंशेकर, अभिजित हुम्बरे (सर्व रा. अनगुळ, जि. बेळगाव, कर्नाटक) हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव जिह्यातील अनगुळ येथील पाच भाविक चारचाकी गाडीतून आषाढी वारीकरिता पंढरपूरला येत होते. पंढरपूरजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात दोनजण ठार झाले, तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.