
पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली जवळपास 23 वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश सिद्धार्थ आणि न्यायाधीश जयकृष्णा उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हा खटला म्हणजे न्यायप्रणालीवरील दुःखद टिप्पणी असल्याचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
2003 साली रईस नावाच्या या व्यक्तीवर त्याची पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप होता. रात्री काैटुंबिक वादातून रईस याने चाकूने वार करून पत्नी आणि मुलांची हत्याचा केल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी मृत महिलेच्या काकांनी तक्रार दिली होती. या हत्येप्रकरणी खटला चालल्यानंतर कोर्टाने आरोपीला चार हत्याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात रईसच्या बचावलेल्या पाच वर्षांच्या मुलाने कोर्टात वडिलांविरोधात साक्ष महत्त्वाची ठरली होती. अझीमने आपली साक्ष फिरवली आहे. तक्रारदार आणि सरकारी वकिलांच्या सांगण्यावरून आपण खोटी साक्ष दिली होती. जर मी त्यांचे ऐकले नसते तर मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती, असे अझीमने म्हटले आहे.
पाच वर्षांचा अझीम आता 28 वर्षांचा झाला आहे. अझीमने आपली साक्ष फिरवली आहे. तक्रारदार आणि सरकारी वकिलांच्या सांगण्यावरून आपण खोटी साक्ष दिली होती, असे त्याने कोर्टात साक्ष दिल्याने आरोपीची सुटका झाली.

























































