
कोपरगाव शहरात सहा वर्षाच्या चिमुरडीवर 22 वर्षाच्या रुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी बालवाडीत शिकत. आरोपी मजुरीचे काम करतो. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी (२ ऑक्टोबर) ही घटना घडली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत घराच्या मागील बाजूस खेळत असताना आरोपीने मुलीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी सकाळी सारखी बाथरूममध्ये जात होती ही गोष्ट पिडीत मुलीच्या आजीच्या लक्षात आली. मुलीच्या आईने मुलीला काय झाले म्हणून विचारले असता आपल्या गुप्तांगाला खाज येत असून दुखत आहे तसेच आरोपी याने रिक्षात आपल्याबरोबर काय काय केले याबाबत आईला सांगितले. मुलीच्या आईने घरातील सर्वांना याबाबत माहिती दिली शेजारी राहणाऱ्या बाईच्या मदतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे पुढील तपास करत आहेत.































































