ऍसिड हल्ल्यातील पीडीत महिला चालवतात कॅफे, स्वत:चे दु:ख विसरून गरजूंना अन्नदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आग्रा येथील शिरोज हँगआऊट कॅफेचे नाव केवळ देशात नव्हे तर विदेशातही पोचले आहे. या कॅफेची वेगळी ओळख आहे. ऑसिड हल्ल्यातील पीडीत महिला हे कॅफे चालवतात. रिसेप्शन, किचन, ऑर्डर घेण्यापासूनची सर्व कामे या महिला करतात. सध्या स्वत:चे दु:ख विसरून या महिला दररोज गरीब- गरजूंना मोफत अन्नदान करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिरोज कॅफे चर्चेत आले आहे.

ऑसिड हल्ला पिडीत महिलांना स्वतŠच्या पायावर उभे करण्यासाठी ‘छांव’ या संस्थेने 2014 साली शिरोज कॅफे सुरू केले. अल्पावधीत या कॅफेची ख्याती सर्वदूर पोचली. गेल्या वर्षी कोरोना महामारीत शिरोज हँगआऊट कॅफे बंद पडले होते. त्यानंतर सात महिन्यांनी कॅफे पुन्हा सुरू झाले. या कालावधीत पॅफेत काम करणाऱया कर्मचाऱयांचे खूप नुकसान झाले. मात्र तरीही या महिला गोरगरीबांना अन्न देत आहेत. जेवणाची पाकिटं वाटत आहेत.

– कॅफेच्या माध्यमातून ऑसिड हल्ला झालेल्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षभरात कॅफेचे 75 टक्के ग्राहक घटले. कॅ फेशिवाय महिलांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. निधी मिळाल्यानंतर आता कॅफे सुरू झाले आहे, असे संस्थापक आशीष शुक्ला यांनी सांगितले.