सोशल मीडियावर महिलांबाबत नकारात्मक कमेंट केल्यास कारवाई, आदिती तटकरे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर अनेकदा महिलांबाबत नकारात्मक कमेंट करण्यात येतात. सर्वसामान्य महिलेपासून ते सरकारी अधिकारीपदावर असणाऱया महिलांचाही यात समावेश असतो. या खालच्या पातळीवरील टीकेमुळे संबंधित महिलेच्या मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. ही बाब लक्षात घेऊन अशा खालच्या पातळीवर केलेल्या टीकेबाबत कडक पावले उचलण्यात येतील, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यावर विविध सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना आदिती तटकरे बोलत होत्या. राज्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून 13 जिल्ह्यांत महिला बचत गटांसाठी उमेद मॉल स्थापित करण्यात येणार आहेत. तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठेत त्यांच्यामार्फत निर्मित वस्तू-अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील. मोबाईल ऍपद्वारे लिंगनिदान करण्यात येते. याबाबत गृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागासोबत स्वतंत्र समिती स्थापन करून अधिकची कार्यवाही करू, वर्किंग वुमेन्स हॉस्टेलची संख्या वाढविण्यासाठी केंद्राच्या सहकार्याने काम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.