वाळु उपसा करणार्‍या विरुध्द धडक कारवाई; 1 कोटी 19 लाखांचा माल जप्त

40
sand-mafia
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व चोरीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करुन यामध्ये 15 वाहनांसह 1 कोटी 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये वाळू, 3 डंपर, 2 ट्रक, 2 टेम्पो अशी एकून 15 वाहने जप्त केली आहे. गोविंद शिवाजी राऊत, संदीप म्हस्के, ऋषी भूजाडी, महेश रमेश कुलट, निहाल ईस्माईल, सचिन दत्तात्र झिटे, रविंद्र भाऊसाहेब पांडव, सोमनाथ आंबादास वर्‍हाडे, गणेश साहेबराव शिंदे, रमेश काळे, अमोल बारे, लालू शहा, गणेश गुंजाळ, मन्सूर दगडूभाई शेख, वैजनाथ भाऊसाहेब शिंदे, मैलाना सत्तार शेख, परमेश्वर पांडूरंग पठारे, संजय दत्तात्रय राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक ईशु सिंधु यांच्या आदेशाने नगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व चोरीविरुध्द धडक कारवाई करुन 15 वाहनांसह 1,19,90,000 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नेवासा, राहुरी, नगर तालुका, श्रीगोंदा, संगमनेर, जामखेड आदी भागात करण्यात आली आहे. यामध्ये नेवसा येथे 2 लाख 20 हजार रुपयांचा टेम्पो, दोन ब्रास वाळू नेत असणार्‍या दोघांवर कारवाई करण्यात आली. राहुरीत भूजाडी पसार झाला असून येथून एक टॅम्पो व एक ब्रास वाळु जप्त करण्यात आली आहे. नगर तालुका येथुन 10 लाख 40 हजार रुपयांचा डंपर व चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. श्रीगोंदा परिसरात 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचा टॅक्टर व ट्रॉलीसह वाळू जप्त करण्यात आली आहे. श्रीगोंदामध्ये एका अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा येथे सात जणांवर गुन्हा दाखल करुन 5 लाख 10 हजार रुपयांचे साहित्य यामध्ये टॅक्टर व वाळू असा ऐवज आहे. तसेच 10 लाख 80 हजार रुपयांचे दोन ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू जप्त करुन संजय दत्तात्रय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जामखेड येथे 61, 10,000 रुपयांचा डंपर, ट्रकसह 21 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील व रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याबापू नानेकर, बाळासाहेब मूळीक, रविंद्र कर्डिले, विजय वेठेकर, दत्ता गव्हाणे, संतोष लोढे, सचिन आडबल, रोहीत मिसाळ, कमलेश पाथरुट, रणजित जाधव, राहूल सोळुंके, विशाल दळवी, मयूर गायकवाड, दिनेश मोरे, मच्छिंद्र बर्डे, विश्वास बेरड, शंकर चौधरी, संदीप दरंदले, रोहीदास नवगीरे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या