आरक्षित भूखंडावर कचरा फेकणाऱ्या वाहनावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंद्रलोक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदेशीररीत्या कचरा व डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार कचरा टाकणाऱ्या टेम्पोवर पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.

महापालिकेने सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे कचरा व डेब्रिज टाकणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. याच ठिकाणी बेकायदेशीरपणे तबेलेवाल्यांनी कब्जा केला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष केले आहे.