
धुरंदर चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग सर्वच सोशल मीडियावर हिट होत असून यातील कलाकारांनी केलेल्या भूमिकांचे देखील कौतुक होत आहे. यात मेजर इक्बालची भूमिका करणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत साखरपुडा केला आहे.

अर्जुन रामपाल याचे पहिले लग्न 1998 मध्ये मॉडेल मेहेर जेसिया सोबत झाले होते. त्यांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. लग्नाच्या २० वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. गॅब्रिएलासोबतच्या अफेयरमुळे अर्जुन व मेहेरचा घटस्फोट दिला. अर्जुनच्या घटस्फोटाच्या आधीपासून तो गॅब्रिएलासोबत लिव्ह इन मध्ये राहत होता, असे बोलले जाते. 2019 मध्ये गॅब्रिएला व अर्जुनला मुलगा झाला. त्यानंतर 2023 मध्ये दुसरा मुलगा झाला.





























































