लोकशाहीत वेडा राजा निवडून देण्याआधीच… अभिनेते अतुल कुलकर्णी यांची पोस्ट व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देशातील आणि जगातील राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी एक मराठी व एक इंग्रजीत अशा दोन पोस्ट शेअर करत सध्याच्या राजकीय स्थितीवर प्रतिक्रिया दिली.

”लोकशाहीत वेडा राजा वेळीच, म्हणजे निवडून देण्या आधीच, ओळखणाऱ्या जनतेला शहाणी जनता म्हणतात”, अशी एक मराठीत पोस्ट शेअर केली आहे. तसेच इंग्रजीत देखील त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ”Playground is not where the diplomacy is won. It’s won in the real world consequences. (मुत्सद्देगिरीचा खेळ हा मैदानात जिंकला जात नाही, तो प्रत्यक्ष जगातील परिणामांतून जिंकला जातो)”, असे कुलकर्णी यांनी शेअर केले आहे.

‘महाराज’ पकडले गेले तरच भोंदू, मग आधी कोण असतात? – अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर अनेक सवाल उपस्थित केले होते. कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ‘महाराज’ पकडले गेले तरच भोंदू, मग आधी कोण असतात? असा सवाल केला आहे.