
तब्येतीच्या तक्रारीमुळे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज ब्रीच पॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे लाखो चाहते चिंतेत असून धर्मेंद्र लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करीत आहेत. माहितीनुसार, धर्मेंद्र यांना वयानुसार स्वास्थ्यासंबंधी काही तक्रारी जाणवत आहेत. यामुळेच रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या काही चाचण्याही होणार आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. 89 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र अजूनही बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. आगामी काळात ते श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात झळकणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.

























































