
सामना ऑनलाईन । मुंबई
‘आजपासून जवळपास 25 ते 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो एक असा काळ होता जेव्हा प्रत्येक चित्रपटात बलात्काराचा सीन असायचा. काही भागांमध्ये असे चित्रपट फार चालायचे. त्यावेळी दिग्दर्शकाने मला सांगितले होते की, जेव्हा तो सीन शूट होईल तेव्हा जाऊन बिनधास्त जबरदस्ती करा. त्याचे म्हणणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो’ असा धक्कादायक खुलासा दलीप ताहिल यांनी एका मुलाखतीत केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘मला जे सांगितले तेच अभिनेत्रीला सांग असे मी दिग्दर्शकाला म्हणाल्यावर त्याची घाबरगुंडी उडाली होती. हा प्रकार मी जेव्हा संबंधित अभिनेत्रीला सांगितला तेव्हा ती घाबरली. ती रडू लागली. त्या काळी अभिनेत्रींना पूर्वकल्पना न देता त्यांना कॅमेरा रोल झाल्यावर बळजबरीने किस केले जायचे. असे सीन करण्यासाठी कलाकारांवर दबाव टाकला जायचा. त्यावेळी इंडस्ट्रीतून बाहेर फेकले जायची भीती असायची.’



























































