
अभिनेता जॅकी श्रॉफ याच्या पत्नीच्या पंपनीत काम करणाऱया संचालकाने त्यांची 58 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला.
आयेशा श्रॉफ यांची पंपनी आहे. त्या पंपनीची वांद्रे येथे व्यायाम शाळा आहे. तेथे मिक्स मार्शल आर्टसचे प्रशिक्षण दिले जाते. पंपनीच्या वतीने हिंदुस्थानात आणि परदेशात फाईट नाईटसचे आयोजन केले जाते. 2018 मध्ये पंपनीने मुंबईत सुपर फाईट लिग्स हा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा त्यांची ओळख एकासोबत झाली होती. त्याने तो बॉक्सर असल्याचे सांगितले होते. त्याची ओळख जास्त असल्याने त्याचा पंपनीला फायदा होईल या हेतूने त्याला पंपनीत संचालक म्हणून कामाला ठेवले.
त्यानंतर त्याने स्वतःचे वेतन वाढवून घेतले. त्यांच्या पंपनीत असलेल्या फायटर्सना थायलँड येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार होते. तेव्हा त्याने आपण फायटर्सना प्रशिक्षण देऊ असे सांगून वेतन वाढवून घेतले. काही महिन्यांपूर्वी पंपनीच्या वतीने हिंदुस्थानबाहेर स्पर्धेचे आयोजन केले जाणार होते. त्या आयोजनासाठी दोन संघटनांची परवानगी आवश्यक असल्याने पैसे भरावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. आयोजनाच्या खर्चाबाबत त्यांनी एकाला विचारणा केली तेव्हा हा प्रकार समोर आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


























































