प्रभासने नाकारल्या दीडशे कोटी रुपयांच्या जाहिराती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपटसृष्टीतील कलाकार चित्रपटांसोबत जाहिरातींमधून बक्कळ कमाई करतात. अवघ्या काही मिनिटांच्या जाहिरातीसाठी कलाकार कोटय़वधी रुपये आकारतात. मात्र इंडस्ट्रीत काही कलाकार असे आहेत जे केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी मिळेल त्या जाहिराती किंवा ब्रँडचे प्रमोशन करत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे साऊथ सुपरस्टार प्रभास.

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’मुळे प्रभासला जगभरात अफाट लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा आपला ब्रँड मोठा करण्यासाठी होईल म्हणून प्रभासला अनेक ब्रँडच्या जाहिरातींसाठी विचारणा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभासने वर्षभरात कपडय़ांपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत तब्बल दीडशे ब्रँडच्या जाहिराती नाकारल्या आहेत. ऑफर नाकारण्याचे कारण प्रभासकडे वेळ नाही असे नसून प्रभासला तो सध्या ज्या स्थानाकर आहे त्याची पूर्ण जाणीक आहे आणि यासाठी तो पूर्ण विचारपूर्वक निर्णय घेऊन जाहिराती व ब्रॅण्ड निवडतो. निवडक ब्रॅण्डसोबतच तो काम करण्याला पसंती देत आहे. आगामी काळात तो ‘राधे श्याम’, ‘सलार’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांत झळकणार आहे.