
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ब़ॉलिवूडमधील अनेक गुपितं चव्हाट्यावर आली आहेत. बॉलिवूडमध्ये घराणेशाही कशी चालते, बाहेरून आलेल्यांवर कसा अन्याय होतो असे आरोप अभिनेत्री कंगना रनौत, प्रकाश राज यांनी केले असतानाच आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

सुशांत सिंह राजपूतला सहा चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते असा आरोप सध्या केला जात आहे. त्याचाच संदर्भ देत ‘स्टाईल’ या गाजलेल्या चित्रपटाचा अभिनेता साहिल खान याने देखील एका अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा अभिनेता कोण हे त्याने स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्याच्या बोलण्यावरून तो अभिनेता सलमान खान किंवा शाहरुख खान यांच्यापैकी एक आहे हे स्पष्ट होते.
‘फार कमी लोकांसोबत असे होते की त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांचा फोटो दोन मोठ्या अभिनेत्यांसोबत एका मोठ्या मासिकाच्या मुखपृष्ठावर छापला जातो. मात्र त्या दोन मोठ्या अभिनेत्यांपैकी एकाला या गोष्टीचं फार वाईट वाटतं. मी तर कमजोर होतो. त्यांचा फॅन होतो. तरिही ते मला बऱ्याचदा साईड रोल्स साठी बोलवायचे. टीव्ही शोसाठी बोलवायचे. नंतर तर ते मला चित्रपटातून काढून टाकायला लागले. नाव मोठं व दर्शन खोटं. ओळखलं का तुम्ही? आता मला त्यांचा काहीच फरक पडत नाही. सुशांत सिंग राजपूतने त्यांचा खरा चेहरा जगाला दाखवला आहे. यावरून समजतं की ही लोकं नव्या चेहऱ्यांना किती घाबरतात. 20 वर्षाच जॉन अब्राहम सोडला तर कोणीच नवीन इंडस्ट्रीमध्ये स्टार नाही झाला. कारण कोणी येऊच देत नाही नवीन लोकांना. फक्त स्टार्सच्या मुलांनाच काम मिळतं.’ अशा पोस्ट साहीलने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने स्टारडस्ट या मासिकावर सलमान खान व शाहरुख खानसोबत छापलेला त्याचा फोटोही शेअर केला आहे.




























































