संकर्षण आता गायनात आजमावणार नशीब!

761

संकर्षण कऱ्हाडेला प्रेक्षकांनी अभिनय, निवेदन आणि कविता करताना ऐकलं आहे, पण आता संकर्षणचं गाणंही प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱया ‘सिंगिंग स्टार’ या सोनी मराठीवरल्या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडेही दिसणार आहे आणि गाणं गाण्यासाठी त्याची मार्गदर्शक आणि जोडीदार केतकी भावे-जोशी असणार आहे.

आपल्या गोड आवाजानं केतकीनंही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. संकर्षण लहानपणी काही वर्षं गाणं शिकला आहे, पण संकर्षण उत्तम कविता करतो. त्याच्या कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक ऐकतच असतात. त्याला गाण्याची उत्तम जाण आहे आणि कवितेतला त्याचा रस त्याला उत्तम गाणं गाण्यात नक्की मदत करेल, असा विश्वास केतकीला आहे. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपापल्या घरी राहूनच संकर्षण आणि केतकी गाण्याचा रियाज करतात. 21 ऑगस्टपासून दर शुक्रवारी रात्री 9 वाजता ’सिंगिंग स्टार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या