तो आत्महत्या करू शकत नाही, काहीतरी षडयंत्र दिसतेय; सुशांत सिंहच्या मामाने व्यक्त केला संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सारखा तरुण आत्महत्या करू शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्याच्या मामाने केली आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सुशांतच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे. यामागे काहीतरी षडयंत्र असावे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सुशांत सिंह गेल्या 6 महिन्यापासून डिप्रेशनमध्ये होता असे मुंबई पोलिसांनी सांगितले. तो डिप्रेशनवर उपचारही घेत होता. या प्रकरणी पोलीस त्याच्या शेजाऱ्यांची चौकशी करत आहे. तसेच त्याच्या मित्रांचीहो चौकशी केली जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूतची अखेरची पोस्ट व्हायरल, आईची आठवण काढत व्यक्त केल्या होत्या भावना

सुशांत सिंह मुंबईतील बांद्रा भागात असणाऱ्या घरात एकटाच राहत होता. त्याच्या घरात काम करणाऱ्या नोकराने पोलिसांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सुशांतचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत होता.

मराठी व्यक्तिरेखेमुळे मिळाली होती ओळख, वाचा सुशांतचा टीव्ही ते रुपेरी पडद्यावरील प्रवास