Esha Deol Divorce : लाडकी लेक ईशाच्या घटस्फोटाने धर्मेंद्र दुखावले, दिला ‘हा’ सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लाडकी लेक ईशा देओलच्या घटस्फोटाबाबत धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईशा व तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी 11 वर्षांच्या संसारानंतर आता विभक्त झाले आहेत. मात्र मुलीचा संसार मोडल्याने वडिल धर्मेंद्र मात्र दुखावले गेले असून त्यांनी मुलीला खास संदेश दिला आहे.

काही दिवसांपूर्वी ईशा आणि भरत तख्तानी हे दोघं विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. या घटस्फोटामुळे ईशाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 12 वर्षांचा संसार मोडला होता. मात्र धर्मेंद्र आपल्या मुलीच्या घस्फोटामुळे दु:खी झाले आहेत आणि ईशाने घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असेही त्यांना वाटत आहे. बॉलीवूड लाईफच्या एका वृत्तानुसार, देओल कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, कोणतेही आई-वडिल आपल्या मुलांचा संसार मोडताना पाहून आनंदी होऊ शकत नाही. धर्मेंद्र तर वडील आहेत. त्यांचे दु:ख कोणीही समजू शकते. याचा अर्थ असा नाही की ते तिच्या निर्णयाविरोधात आहेत. पण त्यांची इच्छा आहे की ईशाने पुन्हा एकदा यावर विचार करावा. वृत्तानुसार, सुत्रांनी सांगितले की, ईशा आणि भरत दोघंही धर्मेंद्रच्या फार जवळ आहेत. हेमा मालिनी आपल्या मुलीच्या निर्णयात तिच्या सोबतच असेल मात्र त्यांचे म्हणणे आहे की आई वडिलांच्या सेप्रेशनचा मुलांवर परिणाम होतो. ते फार दु:खी आहेत आणि याच कारणामुळे त्यांना वाटते की ईशाने घटस्फोटाच्या निर्णय़ाबाबत पुन्हा एकदा विचार करावा.

ईशा आणि भरत यांच्या राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत. ते त्यांच्या आजी-आजोबांचे लाडके आहेत. विभक्त झाल्याने त्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे धर्मेंद्र यांना वाटते की, जर लग्न वाचवू शकतात तर वाचवायला हवे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते पण या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना धक्का दिला होता. 12 वर्षे एकत्र राहिल्यानंतर. दोघांनी परस्पर आणि सौहार्दपूर्ण मार्गाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे उघड करणारे संयुक्त निवेदन जारी केले. त्यांनी लिहिले, आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या आनंदाचा व हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करा.” असं या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. यापूर्वी झूमच्या दुसऱ्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटामुळे कुटुंबातील कोणालाही आश्चर्य वाटले नाही कारण ते काही काळ चालू होते. त्यात पुढे असे म्हटले आहे की ईशाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आपल्या मुलीच्या समर्थनात आहे.