उघड्या-वाघड्या अभिनेत्यांना कपडे घालायला का नाही सांगत! प्रसिद्ध अभिनेत्रीने ट्रोलर्संना झापले

आपल्या बोल्ड अवतारासाठी इशा गुप्ता ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. बोल्ड फोटोमुळे इशा अनेक वेळेला ट्रोलही झाली आहे. अनेक अभिनेते शर्टलेस फोटो टाकतात ते चालतं, त्यांना कपडे घालण्याचा सल्ला का दिला जात नाही असा सवाल इशाने उपस्थित केला आहे. तसेच पूर्वी आपल्याला ट्रोलर्सचा त्रास व्हायचा परंतु आता मी विचार करायचा सोडून दिले आहे, असेही इशाने म्हटले आहे.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)


हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना इशा म्हणाली की, अनेक अभिनेते शर्टलेस फोटो टाकतात, तेव्हा काय बॉडी आहे अशी कमेंटर करुन युजर प्रशंसा करतात. परंतु एका अभिनेत्रीने टॉपलेस फोटो टाकल्यास तिला ट्रोल केले जाते, असे का? मुलींच्या कपड्यांमुळे बलात्कार होतात असा विचार करणे ही हीन दर्जाची मानसिकता आहे असे इशा म्हणाली.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)


तसेच पूर्वी ट्रोलर्समुळे आपल्याला त्रास होत होता. परंतु आता मी प्रगल्भ झाले असून त्यांचा विचार करणे सोडल्याचे
एकदा मी साडी नेसलेला फोटो पोस्ट केला होता तेव्हा अरे वा आज पूर्ण कपड्यात फोटो टाकला अशी कमेंट आली होती. जेव्हा मी मेकअप करून फोटो पोस्ट केला तेव्हा प्लास्टिक सर्जरी केली म्हणून मला हि”णवण्यात आले होते. जेव्हा विना मेकअप फोटो टाकला तेव्हा जाऊन मेक अप कर असेही मला सुनावण्यात आले होते असे इशाने सांगितले.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)


तुम्ही काही करा काही लोक तुम्हाला ट्रोल करतीलच आणि हे फक्त आपल्या देशातच नव्हे संपूर्ण जगात हेच चालंल आहे असेही इशाने सांगितले.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)


स्त्री पुरुष समानतेवर चर्चा करण्या ऐवजी लोक अशा प्रकारे ट्रोल करतात. आपण या बाबतीत चांगला विचार करू अशी आशाही इशाने व्यक्त केली.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)