आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न

मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सामान्यांप्रमाणेच कलाकारांनाही अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. अशातच एका अभिनेत्रीला तिच्या नवऱ्यानेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आधी मसाला स्प्रे मारला. यानंतर तिच्यावर चाकूने वार केले आणि तिचे डोके भिंतीवर आपटले. यामुळे अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजुला श्रुती असं या अभिनेत्रीचे नाव असून ती कन्नड अभिनेत्री आहे. तर अमरेश असे तिच्या नवऱ्याचे नाव असून तो एक रिक्षाचालक आहे, दरम्यान 4 जुलै रोजी तिच्याच नवऱ्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. श्रुती आणि अमरेश यांचा 20 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना दोन मुले असून ते हनुमंतनगरमध्ये भाड्याने राहत होते. 20 वर्षांच्या या संसारत अनेक मतभेद होते. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती.

सततच्या होणाऱ्या वादांमुळे श्रृती आणि अमरेश विभक्त झाले होते. यानंतर नवऱ्याचा त्रासाला कंटाळून तिने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. तीन महिन्यांपूर्वीच अमरेशवर हुंडाबली आणि अत्याचारासारखे गंबीर आरोप श्रृतीने केले होते. मात्र गेल्या गुरूवारीच या दोघांनीही वाद मिटवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेण अभिनेत्रीला महागात पडलं.

श्रृती गुरुवारी घरी आली आणि शुक्रवारी तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. श्रृतीच्या नवऱ्याने मुलं कॉलेजला गेल्याच्या बहाण्याने डाव साधला. अमरेश सर्वात आधी मसाला स्प्रेचा वापर केला. त्यानंतर तिच्या मांडीवर, मानेवर चाकूने अनेक वार केले. इतकंच नाही तर त्याने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. यामुळे तिला गंभीर दुऱापत झाली आहे.

दरम्यान ‘दोघांमध्ये वाद सुरु असताना शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून श्रृतीची मदत केली आणि पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी अमरेशला अटक केली असून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या श्रुतीवर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.