Photo – ‘ही’ अभिनेत्री 42 व्या वर्षी होणार आई; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गूड न्यूज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी टिव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. करिश्मा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर करिश्मा आणि पती वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असून या बातमीने सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण आहे. करिश्माने पती वरुणसोबतचे रोमँटिक आणि खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

या फोटोमध्ये करिश्मा आणि वरुणने खास कॅप घातली आहे, ज्यावर ‘MOM’ आणि ‘DAD’ असे लिहिले आहे.

काही फोटोंमध्ये करिश्मा आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय, तर काही फोटोंमध्ये या दांपत्यामधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

ही पोस्ट इंन्स्टाग्रामवर शेअर करताना करिश्माने ‘एक छोटासा चमत्कार… आमची सर्वात मोठी भेट’ असे भावूक कॅप्शन दिले आहे.

करिश्मा येत्या ऑगस्ट 2026 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. वयाच्या 42 व्या वर्षी आई होण्याचा करिश्माचा हा निर्णय आणि तिचे हे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत सर्वच जण या ‘पॉवर कपल’वर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.