… म्हणून ‘या’ अभिनेत्रीने आई होण्याचं टाळलं होतं, केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या फिटनेसचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. मंदिराचे बोल्ड फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये मंदिरा बेदीने आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत खुलासा केला. यावेळी तिने आपण आई होण्याचे का टाळत होतो याचाही खुलासा केला आहे.

मंदिरा बेदी म्हणाली की, हिंदुस्थानी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ‘समाज काय म्हणेल’, या एका विचारानेच अनेक महिलांना आपल्यात बदल करावा लागतो. परंतु मी मात्र कामामुळे आई होण्याचे टाळत होते. माझ्या आयुष्यातील तो सर्वात कठिण निर्णय होता. त्यावेळी समाजातील लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहात होते.

मी फक्त माझ्या कारकीर्दीकडेच लक्ष देते, घराकडे नाही, असा लोकांचा गैरसमज होता. तुम्हाला वाटत असेल की असा ‘टॅग’ चिकटवला म्हणजे झाले, परंतु आपल्या इथे अशा महिलांना वेगळ्याच नजरेने पाहिले जाते, असेही मंदिरा यावेळी म्हणाली. यावेळी मंदिराने विवाहित महिलांना एक सल्लाही दिला आहे. प्रत्येक महिलेने स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वाव ठेवायला हवा. मी आज जे काही आहे ते माझ्या निर्णयांमुळे आहे, असेही ती म्हणाली.

दरम्यान, मंदिरा बेदी हिने चित्रपट निर्माता राज कौशल याच्याशी विवाह केला आहे. पतीची प्रशंसा करताना मंदिरा थकत नाही. राज खूपच सपोर्टिव्ह असून मुलाचीही काळजी घेतो आणि नंतर चित्रिकरणाला जातो, असे मंदिरा सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या