लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड बेलीडान्स, पाहा व्हिडीओ

1727

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. दर दिवसाला ती सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट टाकत असते. नुकताच तिने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायिका शकिरा हिच्या एका गाण्यावर बेली डान्स केला आहे. या बेली डान्समध्ये उर्वशी एकदम हॉट दिसत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणने आहे.

सिल्व्हर शिमर लूकच्या ड्रेसमधल्या उर्वशीचा लूक देखील सुंदर असून तिचा हा बेली डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अवघ्या काही तासात लाखो लोकांनी लाईक केले होते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीने कोविड लढ्यासाठी काही संस्थांना पाच कोटी रुपयांची मदत देखील केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या