
प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुषची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. उद्या हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र या सगळ्यात हा चित्रपट ओटीटीवरही येणार असल्याचे बोललं जातंय.
मायथॉलॉजिकल ड्रामा म्हणून आदिपुरुषकडे पाहिले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणामुळे लांबणीवर पडला होता. त्यानंतर तो उद्या प्रदर्शित होतो आहे. तब्बल चारशे कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या चित्रपटानं लाखो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपण प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या भावनांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेलरनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. आता तर प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटानं पाच कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्याच्या प्री अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटी आणि निर्माते यांनी देखील या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर तिकीटं खरेदी केली आहे.यामध्ये द काश्मिर फाईल्सचे निर्माते आणि प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी दहा हजार तिकीटं बूक केल्याच्या बातम्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या सगळ्यात आदिपुरुषची ओटीटी डेट समोर आली आहे.
चित्रपट समीक्षक यांच्या मते हा चित्रपट शाहरुखच्या पठाणचेही रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे बोलले जात आहे. मेकर्सनं डिमांड सर्व्हिस अॅमेझॉन प्राईम व्हिडिओनं आदिपुरुषला ओटीटी प्रदर्शनाचे राईट्स दिल्याचे समजते आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आठ आठवड्यानं हा चित्रपट ऑगस्टमध्ये ओटीटीवर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे





























































