
हिंदुस्थानी महिला फुटबॉलमधील एक महत्त्वपूर्ण पर्व आज संपले. युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू आदिती चौहान हिने वयाच्या 32 व्या वर्षी सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
आदिती चौहान एक उत्कृष्ट गोलकीपर होती. ती हिंदुस्थानी संघासाठी 57 सामने खेळली असून सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धेत 2012, 2016 आणि 2019 च्या विजेत्या संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. ती काही काळ हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघाची कर्णधारही होती. तसेच इंग्लंडमधील ‘वेस्ट हॅम युनायटेड लेडीज’ या क्लबकडून खेळणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला ठरली होती. तिच्या या कामगिरीने देशभरातील तरुणींना फुटबॉलमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. निवृत्तीनंतर आदिती चौहानने फुटबॉल प्रशिक्षण, महिला खेळाडूंचा विकास आणि खेळाबाबत जनजागृती यावर लक्ष पेंद्रित करणार असल्याचे संकेत दिले आहेत.