
बॉलीवूड अभिनेत्रीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या खटल्यात दिंडोशी सत्र न्यायालयाने मंगळवारी बॉलीवूड अभिनेता आदित्य पंचोली याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदित्य पंचोली याने 2004 ते 2009 या काळात आपल्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार या अभिनेत्रीने वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी पंचोलीविरुद्ध बलात्कार व मारहाण करणे, खंडणी उकळणे इत्यादी गुह्यांत सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने पंचोली याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या अर्जाची सुनावणी आज दुपारी विशेष न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांच्यासमोर झाली. त्यावेळी त्यांनी पंचोलीचा अर्ज मंजूर केला.


























































