आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

6072

‘नया है वह… असल्याचा किंवा कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला अनुभव नसल्याचा आनंदच आहे. कारण म्हणूनच मी लोकांचा वंश, धर्म, जाती, लिंग, पंत वा राजकीय रंग न पाहता त्यांच्यासाठी काम करीत आहे,’ अशा शब्दांत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

कोरोनाविरोधात राज्य सरकार लढत असताना विरोधी पक्षनेत्यांकडून मात्र टीका केली जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी ‘नया है वह’ अशी टिपणी केली होती. याला सडेतोड उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘द्वेष आणि असुरक्षिततेच्या भावनेतूनच विरोधी पक्ष महाविकास आघाडीविषयी ऑक्टोबरमध्ये सरकार कोसळणार असल्याच्या अफवा पेरत आहे. या तर्कामध्ये कसलेही तथ्य नाही. त्या फक्त अफवा आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय आह़े.’

टीकाकारांच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणे हाच उत्तम मार्ग

आम्ही जे काही करतो त्यावर टीका करायला त्यांना आवडते. परंतु तुम्ही वेंâद्र सरकारविरुद्ध बोललात तर मग तुम्ही त्यांच्यासाठी देशद्रोही ठरता. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणं हाच उत्तम मार्ग आहे. हे मानवतेसाठी चांगलं नाही. दुर्दैवानं जग कुठल्या परिस्थितीतून जात आहे, याची जाणीव त्यांना नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या