
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील श्री शिवाजी हायस्कूलला त्यांनी भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
























































