शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी फेरीबोटीतून अनुभवला कोकण किनारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकण आणि शिवसेना हे एक अतूट नातं आहे. कोकणातल्या निसर्गरम्य सौंदर्यांचा अनुभव शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेताना जयगड ते तवसाळ असा फेरीबोटीने प्रवास करत समुद्र सफरीचा आनंद लुटला. गुहागर तालुक्यातील कुडली येथील रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज हेलिकॉप्टरने जयगड येथे आले. त्यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज खास फेरी बोटीतून प्रवास करत कोकण किनाऱ्याचे वैभव अनुभवले. जयगड ते तवसाळ आणि तवसाळ ते जयगड असा प्रवास त्यांनी फेरीबोटीतून केला. फेरीबोटीचे व्यवस्थापक योगेश मोकल यांनी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. जाताना फेरीबोटीत गप्पागोष्टी रंगल्या होत्या तर परतीच्या प्रवासात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बोटीच्या डेकवर जाऊन अथांग समुद्राकडे दृष्टीक्षेप टाकत फेरीबोटीच्या कामकाजाबाबत योगेश मोकल यांच्यासोबत चर्चा केली.स मुद्रात जोरदार वारे वाहक होते मात्र कोकण किनार पट्टीचे हे सौंदर्य शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे डोळ्यात साठवत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर,सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,जिल्हाप्रमुख सचिन कदम उपस्थित होते.