महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी अॅड. संदीप गुळवे यांना देण्यात आली आहे.
संदीप गुळवे यांनी सोमवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी गुळवे यांना एबी फॉर्म दिला. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अनिल परब, ज. मो. अभ्यंकर आदी उपस्थित होते. त्यांनी गुळवे यांना शुभेच्छा दिल्या.
संदीप गुळवे हे निश्चितच विजयी होतील, असा विश्वास नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.