
ईदला सलमानचा चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ असतो. नुकत्याच ओटीटीवर आलेल्या ‘राधे’ने मात्र सर्वांची निराशा केली आहे. त्यामुळे सलमानच्या करियरवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ‘‘नायक म्हणून सलमान संपलाय, त्याने आता बिग बी यांच्याप्रमाणे सहाय्यक भूमिका निवडाव्यात,’’ असे मत चित्रपट व्यापार विश्लेषक आमोद मेहरा यांनी मांडलेय.
एका मुलाखतीत आमोद मेहरा म्हणाले, ‘‘चित्रपटाच्या प्रत्येक गोष्टीत सलमानचा हस्तक्षेप वाढलाय. तो स्वतःला खूप मोठा समजतो. डान्स स्टेप कोणत्या असाव्यात, चित्रपटाला संगीत कुणी द्यावे हे तोच ठरवतो. दिग्दर्शनातही त्याची ढवळाढवळ असते.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘सलमानच्या अवतीभोवती हांजीहांजी करणारी मंडळी खूप आहे. पण ते त्याचे खरे मित्र नाहीत. सलमानचे कोणते निर्णय चुकतायत हे ठामपणे त्याला कुणीही सांगण्याची हिंमत दाखवत नाहीत.’’
हीच योग्य वेळ!
मेहरा म्हणाले, ‘‘मृत्युदाता’ चित्रपटा वेळी बिग बी यांनी वयाची पन्नाशी ओलांडली होती. तरीही ते एखाद्या तरुणासारखा अभिनयाचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांचे काही चित्रपट आपटले. हीरो म्हणून आपले करिअर संपुष्टात आल्याची जाणीव झाल्यावर ‘मोहब्बते’मधून स्वतःला नव्या अंदाजात सादर केले. सलमानची कारकीर्द संपलीय असे मला म्हणायचे नाही. परंतु हिरो म्हणून त्याची कारकीर्द नक्कीच संपली आहे. त्याने आता स्वतःला नव्या अंदाजात सादर करावे.
























































