न्यायदान करणारा वकील करतोय प्राणदान, गावकऱ्यांना जगविण्यासाठी धडपड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
oxygen-machine-help

घार उडते आकाशी चित्त तीचे पिलापाशी… या म्हणी प्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या सारंग आराध्ये यांचे लक्ष आपल्या जन्मभूमीकडे आणि तिथल्या माणसांकडे असते. कोविड महामारीच्या काळात आपल्या गावकऱ्यांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन आवश्यकता आहे हे मशीन उपलब्ध नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी वाचून मन विषण्ण झालेल्या वकिलाने पावणेपाच लाख रुपयांची दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन पंढरपूरकरांसाठी भेट दिली आहेत. अॅड. सारंग यांची ही निष्काम सेवा कोरोनाच्या अनेक रुग्णांना जीवदान देत आहे.

मूळचे पंढरपूरचे रहिवासी असलेले अॅड. सारंग सतीश आराध्ये हे सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमीशी असलेली नाळ अॅड सारंग यांनी तुटू दिलेली नाही हेच त्यांच्या या सामाजिक कार्यातून दिसून येते.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले. लाखो लोक या महामारीचे शिकार ठरत आहेत. महामारीची लागण झालेल्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यक अधिक भासते.

पंढरपूरची लोकसंख्या आणि इथे मिळत असणाऱ्या वैद्यकीय सुविधा यामध्ये खूपच तफावत असल्याने केवळ ऑक्सिजन मशीन उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुरेशी वैद्यकीय सुविधा नसल्याने आपल्या आप्तइष्टाना जीव गमवावा लागत असल्याची बातमी अॅड सारंग यांच्या जिव्हारी लागली.

आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवे यासाठी त्यांच्या मनाची घालमेल सुरू झाली आणि शालेय मित्र डॉ प्रविदत्त वांगीकर यांच्या मार्गदर्शनातून सुमारे 3 लाख 87 हजार रुपयांचे हाय फ्लो नेसल ऑक्सिजन आणि दुसरे 80 हजार रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर मशीन असे एकूण 4 लाख 67 हजार रुपये खर्च करून अॅड. सारंग यांनी दोन मशीन अमेरिका येथून खरेदी केल्या आहेत. या दोन्ही मशीन गरजू रुग्णांना मोफत वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या जात असून आजवर अनेक रुग्णांनी या ऑक्सिजन मशीनचा लाभ घेऊन आपले प्राण वाचविले आहेत.

सामाजीक बांधिलकीच्या नात्याने अॅड सारंग आराध्ये यांनी पंढरपूरकरासाठी दिलेले हे योगदान अनमोल असेच आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

मशिनसाठी संपर्क… ओकार जोशी मित्र मंडळ अॅड.सारंग आराध्ये ( 9892877979 ), डॉ. मिलिंद जोशी ( 9822446057 ), ऋषिकेश उत्पात ( 9822259282), अॅड.ओकार जोशी ( 8624939000), मंदार केसकर ( 9422380146) यांचे कडे हे मशीन उपलब्ध असणार आहे गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.