
आशियातील सर्वात मोठय़ा एअर शोपैकी एक असलेला एरो इंडिया 2025 हा एअर शो, सोमवारपासून सुरू होत आहे. 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत बंगळुरूतील वायू दलाच्या येलहंका या तळावर हा एअर शो होईल. यावेळी अनेक आधुनिक लढाऊ विमाने आणि ड्रोन तंत्रज्ञान पाहायला मिळेल. विशेष म्हणजे अमेरिकेच्या हवाई दलाने बंगळुरू येथे होत असलेल्या एअर शोमध्ये पाचव्या पिढीतील लढाऊ विमान एफ-35 पाठवले आहे. रशियाचेदेखील त्यांच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमान सुखोई-एसयू-57 प्रदर्शन करेल. हिंदुस्थान सातत्याने आपल्या लष्करी क्षमतांमध्ये वाढ करत आहे. हिंदुस्थानच्या हवाई दलाकडे अद्याप पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने नाहीत.