चीनमध्ये पुलाखाली अडकले विमान! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

1092

चीनमधील एका विमानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाटय़ाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत चक्क एक विमान वाहतुकीच्या पुलाखाली अडकल्याचे दिसतेय. त्यामुळे नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

चीनच्या हरबीन शहरातील ही घटना असून हे विमान लँडिंगवेळी नाही तर एका ट्रेलरवरून घेऊन जात असताना पुलाखाली अडकले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार दुरुस्तीसाठी या विमानाचे भाग वेगळे करून ते ट्रेलरवरून नेले जात होते. त्यावेळी  ड्रायव्हरला अंदाज न आल्याने हे विमान पुलाखाली अडकले. हे विमान बाहेर कसे काढता येईल यासाठी मार्ग शोधत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.

ड्रायव्हरने लढवली नामी शक्कल

या हास्यास्पद परिस्थितीतून सुटका करण्यासाठी ड्रायव्हरने नामी शक्कल लढवली. ट्रेलरची चाके उंच असल्याने विमान पुलाखालून सुरक्षित काढण्यासाठी ड्रायव्हरने ट्रेलरच्या सर्व चाकांमधली हवा काढली. चालकाने लढवलेली ही शक्कल कामी आली आणि विमान पुलाखालून सुखरूप बाहेर आले. चाकांमध्ये हवा भरून ट्रेलर पुन्हा रवाना करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या