
अफगाणची राजधानी काबूलमधील मिलिटरी ऍकेडमीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 6 जण ठार झाले. यात दोन नागरिक, तर चार जवानांचा समावेश आहे. तसेच इतर 12 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास हा हल्ला झाला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे, अशा शब्दांत अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घाणी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. मिलिटरी ऍकेडमीवर याआधीही अनेकदा हल्ले झाले आहेत.


























































