
प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने अखेर 25 वर्षांनंतर पाकिस्तानला अलविदा केले आहे. 2000 सालापासून मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानात कामकाज सुरू केले होते. 25 वर्षांनंतर कंपनीने पाकिस्तानातील कॉर्पोरेट ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानात उच्च शिक्षा आयोग आणि पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजसारख्या संस्थेसोबत मिळून डिजिटल स्कील्स, ट्रेनिंग, मायक्रोसॉफ्ट टीम्सद्वारे रिमोट लार्ंनग आणि टेक्नोलॉजी सोल्यूशन्सची सुविधा सुरू केली होती.