
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वागदरी येथे मृत्यूनंतरही यातना भोगावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती उघड झाली आहे. येथील गावात मृत्यूची घटना घडल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून वाट काढावी लागते. रस्त्याअभावी नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.
येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी नदीतून वाट काढावी लागत आसल्याने मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आसल्याचे चित्र आहे. वागदरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी नदीतून जावे लागते. पावसाळयात या स्मशानभूमीच्या रस्त्यावर पूल नसल्याने या गावातील लोकांना अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी पाण्यातून रस्ता काढीत जीव धोक्यात टाकून अंत्यसंस्कारासाठी जावे लागत आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या नदीला मोठया प्रमाणावर पाणी असल्याने अंत्यविधीसाठी खोल पाण्यातून जावे लागते.
वागदरी येथे गावाजवळ मोठी नदी असून नदीच्या पलिकडे स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नदीला जर पूर आला तर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. रविवारी वागदरी येथे काशिनाथ सोनकांबळे यांचे निधन झाले त्यांच्यावर 13 ऑक्टोबर रोजी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना चक्क नदीच्या पाण्यातून कसरत करत जावे लागले. या गावातील लोकांना मरणानंतर ही यातना भोगाव्या लागतात याचे विदारक चित्र समोर आले आहे. गावोगाव विकासाची कोटीची उड्डाने होवून ही स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही,ना रस्त्यावर पूल नाही त्यामूळे मरणानंतर ही अंत्यसंस्कार सुध्दा ञासाविना करता येत नाही. या त्रासाकडे प्रशासन लक्ष देईल का ? असा संतप्त सवाल वागदरी ग्रामस्थातून उपस्थीत केला जात आहे.
स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर पूल उभारावा…
गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीतून जावे लागते.पावसाळयात नदीला पूर आणि पाणी आल्यावर स्मशानभूमीकडे जाताना पाण्यातून कधी कधी पोहत जावे लागते. मरणानंतर ही स्मशानभूमीकडे जाताना ही त्रास सोसावा लागतो. याविषयी लोकप्रतिनिधींना सांगितले त्यांनी या रस्त्याची पाहणी केली तरी पूल झाला नाही,अशी प्रतिक्रिया पांडूरंग उदगीरे या ग्रामस्थांनी दिली.
तात्काळ नदीवर पूल बांधावा…
स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर नदीवर प्रशासनाने पूल बांधावा त्यामुळे स्मशानभूमीकडे जाताना त्रास होणार नाही. लोकप्रतिनिधीनी याची पाहणी करूनही उपाययोजना केल्या नाहीत त्यामूळे प्रशासन व लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष घालावे आशी मागणी वागदरीच्या महिला सरपंचानी केली आहे