पाकिस्तानी ओटीटी कंटेंटवर बंदी

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी वेबसीरिज, चित्रपट आणि पॉडकास्टवर बंदी घालण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबतची सूचना जारी केली. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता सर्व मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनी मूळ पाकिस्तानी कंटेट असलेल्या वेबसीरिज, सिनेमा, गाणी, पॉडकास्ट आणि अन्य स्ट्रींमग मीडिया कंटेंट यांचे प्रसारण त्वरित थांबवावे, असे ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे.