बीडमधील वडवणीत विजेचा खेळखंडोबा; ग्रामस्थांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी 

ऐन सणासुदीच्या दिवसात वडवणी तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वडवणीसह चिंचोटी, साळीबा, मामला गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. वडवणीतील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर रविवारी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. वडवणी तालुक्याला वीज मंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात वीज गायब आहे. आठवडाभरापासून वडवणीमध्ये अंधार आहे. हिंदूंच्या सणात वीज मंडळाचा रामभरोसे कारभार सुरू आहे. वीज मंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी संतप्त नागरिकांनी विद्युत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.