’प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा’ कठोर करा;वर्सोव्यात शेकडो प्राणिप्रेमींचे निषेध आंदोलन

400

एरवी नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखे आंदोलन केले. वर्सोव्याच्या यारी रोडवरील महापालिका उद्यानातआज की आवाजया सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने आयोजित आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 150 हून अधिक प्राणीप्रेमी तसेच जागरूक नागरिकांनी एकमुखानेप्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदाअधिक कठोर करण्यात यावा ही मागणी केली.

मालाड येथील एका कसायाने एका कुत्रीला ठार मारून तिच्या तीन आठवडय़ांच्या सहा पिलांना अनाथ केल्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बेझुबान, बुझो होप फॉर स्ट्रेज, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे ओशिअनिक, मूव्हमेंट ऑफ सिटिझन्स अव्हेअरनेस, यारी रोड कलाविहार असोसिएशन, माहिती सेवा समिती आणि एकता मंच या संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही हातात घोषणा फलक घेऊन या आंदोलनात सहभाग घेतला.

प्राण्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला फक्त 100 रुपये दंड

प्राण्यांची हत्या करून जर 20, 50 किंवा 100 रुपये इतका अत्यल्प दंड भरावा लागणार असेल तर असा पोकळ कायदा प्राणी हत्या करण्यापासून एखाद्याला कसा काय रोखू शकेल? प्राण्यांविरोधातील क्रूरता, हिंसाचार रोखायचा असेल तर सरकारने या कायद्याअंतर्गतची शिक्षा कठोरात कठोर करावी हीच सर्व प्राणीप्रेमींची एकमेव मागणी आहे,’ असेआज की आवाजचे अध्यक्ष अजय कौल यांनी सांगितले.

प्राण्यांनाही भावना असतातहा संदेश संपूर्ण समाजात पसरावा यासाठीआज की आवाजया संस्थेने #AnimalsHaveFeelingsToo या हॅशटॅगसह मराठी, हिंदी व इंग्रजीत एक कॅम्पेनही उभारले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या