
जगप्रसिद्ध ताजमहाल वास्तू बघायला जाणार असाल आणि अॅडव्हान्स बुकिंग केलेले नसेल तर विचार सोडून द्या. कारण ताजमहालची वीकेंडची सर्व तिकिटं तत्काळ विकली जात आहेत. आणि तिकीटं नसेल तर तुम्हाला निराश होऊन परतावे लागेल. शनिवारी सकाळी 11 वाजताच ताजमहालची दिवसभराची सर्व तिकिटं संपली आहेत. रविवारची स्थितीही तीच आहे.
कोरोनामुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या पर्यटनावर बंधने आहेत. ताजमहाल वास्तूत एका दिवसात जास्तीत जास्त केवळ पाच हजार पर्यटकांना प्रवेश मिळू शकतो. सकाळी 1500 आणि दुपारी 3500 पर्यटकांना आत सोडले जाते. ही सगळी तिकिटं सकाळी तासाभरात संपून जातात.
























































