विद्यमान पाच आमदारांसह राधाकृष्ण विखे यांना शिर्डीतून तर वैभव पिचड यांना अकोल्यातून उमेदवारी

bjp-logo

भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नगर जिल्ह्यातील विद्यमान पाच आमदारांसह राधाकृष्ण विखे यांना शिर्डीतून तर वैभव पिचड यांना अकोल्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत श्रीगोंदातून बबनराव पाचपुते यांचा पराभव झाला असताना यंदा सुद्धा त्यांना उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाने आठ ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहे.

नगर जिल्ह्यातून विद्यमान आमदारांपैकी पालकमंत्री राम शिंदे कर्जत जामखेड, शेवगाव पाथर्डी मधून मोनिका राजळे, राहुरी मतदार संघातून शिवाजी कर्डिले, नेवासा मतदारसंघातून बाळासाहेब मुरकुटे, कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे यांचा समावेश आहे तर शिर्डी विधानसभा ठिकाणाहून मंत्री राधाकृष्ण विखे तर अकोले मधून मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच श्रीगोंदा मधून बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध अद्यापही उमेदवारी देण्यात आलेला आहे. त्यामुळे संगमनेर मधून नेमकी कोणाला कोणाला उमेदवारी मिळते याबाबत आता उत्सुकता लागली आहे.

भाजपाने जाहीर केलेल्या जागांमध्ये नगर जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान पाच आमदारांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे, गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारचे तर्कवितर्क मांडले जात होते , काहींची उमेदवारी रद्द होणार तर काहींचे मतदारसंघ बदलणार अशी चर्चा नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोर धरू लागली होती, विशेष म्हणजे विद्यमान आमदारांना फटका बसणार असे सुद्धा बोलले जात होते, मात्र भाजपाने जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या उमेदवारांना संधी दिली आहे विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केले आहे.

जामखेड कर्जत मधून पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून याठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळून येणार आहे, त्यामुळे या लढतीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर मात्र भाजपाने त्यांना पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्याशी लढत होईल अशी शक्यता आहे तर कोपरगाव मध्ये पुन्हा स्नेहलता कोल्हे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने अद्याप पर्यंत उमेदवारी जाहीर केलेली नाही राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांचे सुद्धा अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू असल्यामुळे उमेदवारी करणार की नाही याबाबत सुद्धा आता तर्क-वितर्क मांडले जात आहे, ते निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा राष्ट्रवादी कडून उभे राहण्याची शक्यता आहे तर नेवासा मतदारसंघांमध्ये बाळासाहेब मुरकुटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यांच्यासमोर पुन्हा प्रतिस्पर्धी म्हणून माजी आमदार शंकर गडाख यांच्यात लढत होणार आहे तर राहुरी मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेमकी उमेदवारी कोणाला मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे याठिकाणी बहुदा तिरंगी लढत होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे

अकोले मतदारसंघ हा राष्ट्रवादी आघाडीने प्रतिष्ठेचा केलेला आहे, मधुकर पिचड यांना  धूळ चारायची असा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे याठिकाणी आमदार वैभव पिचड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आता या ठिकाणी एकच उमेदवार त्यांच्या विरोधात कसा राहील यासाठी आता प्रयत्न करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या