
सामना प्रतिनिधी, अहमदाबाद
अदानी उद्योग समूहाने हिंदुस्थानातील जागतिक दर्जाच्या क्रीडापटूंचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी दीर्घकालीन उपक्रमाची घोषणा केली. ग्रुपचा रियो ऑलिम्पिक्स 2016 च्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमानंतर नाव देण्यात आलेला ‘गर्व है’ हा देशव्यापी उपक्रम आहे. हा उपक्रम क्रीडा क्षेत्रातील भागधारकांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करणार आहे.
15 मेपासून सुरू झालेल्या ‘गर्व है’ उपक्रमाला विविध खेळांमधील ऍथलीटस्, प्रशिक्षक, क्रीडा संस्था यांच्याकडून अर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे. 29 राज्यांतील 100 शहरांपर्यंत पोहोचणारा आणि पाच हजार प्रवेशिकांची पूर्तता करणारा हा उपक्रम मोठी कामगिरी करण्याची आशा असलेले 15 हून अधिक संभाव्य ऍथलीटस् निवडून त्यांच्या खेळाचा विकास करण्याच्या या उपक्रमाला आतापर्यंत तीन हजारहून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. ‘गर्व है’ उपक्रमाद्वारे पाठिंबा देण्यात येणाऱया खेळांच्या यादीमध्ये तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, शूटिंग आणि कुस्ती अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. अंकिता रैना (टेनिस), पिंकी जांगरा (बॉक्सिंग), संजीवनी जाधव (ऍथलेटिक्स), मलायका गोयल (नेमबाजी), मणदीप जंगरा (बॉक्सिंग), इंद्रजीत सिंग (ऍथलेटिक्स), खुशबीर कौर (ऍथलेटिक्स), शिवा थापा (बॉक्सिंग) अशा आदर्श खेळाडूंचा या उपक्रमात समावेश करून हिंदुस्थानला क्रीडा क्षेत्रात सुपर पॉवर बनवण्याचे अदानी उद्योग समूहाचे ध्येय आहे.
‘हिंदुस्थानी क्रीडापटू आंतरराष्ट्रीय पटलावर चमकदार कामगिरी करीत आहेत. एक जबाबदार उद्योग समूह म्हणून देशातील प्रतिभावंत क्रीडापटूंना सर्वतोपरी मदत करून आम्हाला क्रीडा क्षेत्रातही समर्थ हिंदुस्थान घडवायचा आहे.’
– प्रणव अदानी, संचालक, अदानी इंटरप्राइजेस

























































